भारतामध्ये पहिल्यांदाच लॅप्रोस्कोपिक एग-बाइंडिंग शस्त्रक्रियेद्वारे चार पूर्ण विकसित अंडी यशस्वीपणे बाहेर काढण्यासह कासवाला नवे जीवनदान देण्यात यश
श्री नावाच मादी कासव हे गेल्या 1-2 महिन्यांपासून अनेक आरोग्य समस्यांशी संघर्ष करत होती. पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकने क्रॉनिक एग-बाइंडिंग सिंड्रोम, यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. ही दुर्मिळ प्रक्रिया नामांकित पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या शस्त्रक्रियेत चार पूर्णता तयार झालेली अंडी बाहेर काढण्यासह या कासवाला वाचविता आहे. आता बरे होऊन पुन्हा पुर्ववत वावरणे सुरू झाले आहे. नेहमी सक्रिय असणारं श्री नावाच मादी कासव गेल्या काही महिन्यांपासून अचानक सुस्त झाले होते, या कासवाने आहाराचे सेवन देखील बंद केले होते. तळेगावजवळील सोमाटणे येथे राहणारे या पाळीव कासवाचे पालक, श्री आणि श्रीमती नामदेव यांना या कासवाच्या अंडी बाहेर पडण्याच्या जागेस सूज आल्याने श्री अस्वस्थ होत असल्याचे दिसून आले. श्रीला अशा अवस्थेत पाहणे आमच्यासाठी अतिशय वेदनादायक होते अशी प्रतिक्रिया या कासवाच्या पालकांनी व्यक्त केली. अंडी बाहेर ढकलण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु श्रीला ते अवघड ठरत होते. या कासवाला पुण्यातील द स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये नेण्यात आले. यावेळी काही चाचण्या करण्यात आल्या आणि तपासणीत दिसून आले की ‘एग बाऊडींग’ चा ( अंड बाहेर काढू न शकणे) त्रास असल्याचे लक्षात आले. या स्थितीत कासव नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकत नाहीत. अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि पूर्णपणे तयार झालेली अंडी देखील दिसून आली, तर रक्त चाचण्यांमध्ये या कासवाची हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे दिसून आले. एपिडोसिन इंजेक्शनने अंडी बाहेर काढण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले. तिला हाताने खायला देण्यात आले आणि बारकाईने त्याचे निरीक्षण करण्यात आले. प्रसूती प्रवृत्त करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेपूर्वी रक्त चाचणी करण्यात आली. श्रीने खाणे बंद केल्याने तिची शक्ती टिकवून ठेवण्यासाठी तिला हाताने खायला देण्यात आले. श्रीच्या पोटाच्या अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि अनेक तयार झालेली अंडी आढळून आली. तिचे हृदय सामान्यपणे काम करत होते, जे शस्त्रक्रियेपूर्वीचे सकारात्मक लक्षण होते. मात्र रक्त चाचण्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली, म्हणून ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी काही औषधे लिहून देण्यात आली. द स्मॉल अॅनिमल क्लिनिकमधील पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी सांगतात की “श्रीची शस्त्रक्रिया २१ जुलै २०२५ रोजी लॅप्रोस्कोपीक पध्दतीचा वापर करुन केली जाणार होती, जी अतिशय सुरक्षित पद्धत आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरामदायी राहण्यासाठी तिला काळजीपूर्वक इंट्युबेट करण्यात आले आणि ऑक्सिजनसह भूल देण्यात आली. तिचे वजन १.५ किलो होते. बीपी डॉप्लर आणि एसपीओ२ सेन्सर वापरून तिच्या जीवनावश्यक अवयवांचे निरीक्षण करण्यात आले. तिला उबदार ठेवण्यासाठी, खाली एक हीटिंग पॅड ठेवण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान, गर्भाशयाच्या उजव्या मागच्या पायाजवळील एका लहान छिद्र पाडून अंडाशय (फॅलोपियन ट्यूब ही नळीसारखी रचना आहे जी गर्भाशयापासून अंडाशयापर्यंत पसरते) मध्ये हळूवारपणे प्रवेश केला गेला आणि चार पूर्णपणे तयार झालेली अंडी काढण्यात आली. त्यानंतर, अंडाशय देखील काढून टाकण्यात आले. श्री एका तासातच बरी झाली. तिला बरे होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर ३ ते ५ दिवस इंजेक्शन देण्याचा सल्ला देण्यात आला. सहसा, अशा प्रकरणांमध्ये, अंडी काढण्यासाठी कवच कापावे लागते मात्र या प्रकरणात डॅाक्टरांनी प्रसंगावधान राखत शस्त्रक्रिया केल्याने कवच वाचविता आले. त्यामुळे संसर्गाचा धोका टळला. ही भारतातील पहिली लॅपरोस्कोपिक एग-बाउंड शस्त्रक्रिया आहे, जिथे सेव्होफ्लुरेन गॅस ऍनेस्थेसियासह GE 620 केअरस्टेशनचे यांत्रिक व्हेंटिलेशन वापरले गेले. डॉ. नरेंद्र परदेशी पुढे म्हणाले, शस्त्रक्रियेनंतर आम्हाला श्री च्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. ती सक्रिय आणि उत्साही वाटू लागली. आम्ही तिची हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यासाठी तिला पाच डोस आळीपाळीने मल्टीविटामिन आणि आयर्नचे इंजेक्शन देण्यास सुरुवात केली. त्यासोबतच, तिला बरे होण्यास मदत करण्यासाठी तिला तोंडावाटे पोषक आहार देण्यात आला. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आम्ही शस्त्रक्रियेच्या ठिकाणी अँटीसेप्टिक मलम लावण्याचा सल्ला देखील दिला होता. आता तिच्या प्रकृतीत खुप सुधारणा झाली आहे. तिची शारीरी हालचाल आणि खाण्याच्या सवयींमध्येही फर जाणवत आहे. शस्त्रक्रियेनंतर पूर्ण एका तासाच्या आत ती बरी झाली आणि तिला घरी सोडण्यात आले. श्रीला वेदना होत असल्याने ती नीट खाऊ किंवा हालचाल करू शकत नसल्याचे पाहून आम्हाला खूप भीती वाटली. तिला या त्रासातून मुक्त केल्याबद्दल मी डॉ. नरेंद्र परदेशी आणि श्रीमती रीना हरिभट, अंकिता, अस्मी परदेशी आणि अपर्णा फणसाळकर यांच्यासह संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. श्री आता पुन्हा सक्रिय झाली आहे आणि जेवू लागली आहे, अशी प्रतिक्रिया श्रीचे पालक श्रीमती नामदेव यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया (0)
No comments yet. Be the first to comment!