सदर स्पर्धा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती व इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचा 42 वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून दिनांक 26 27 28 मे रोजी तीन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
इंडियन मार्शल आर्ट च्या वतीने दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सर्वे नंबर 33/२ लेन नंबर 14 विद्यानगर पुणे येथे आयोजित केल्याची माहिती इंडियन मार्शल आर्ट संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत दिली सदर स्पर्धा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती व इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचा 42 वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून दिनांक 26 27 28 मे रोजी तीन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी कला क्षेत्रातील कलावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत उद्घाटक म्हणून मिथुन चक्रवर्ती हे उपस्थित राहणार असल्याची माहिती हुलगेश चलवादी यांनी दिली इंडियन मार्शल आर्ट या संस्थेची स्थापना 1984 साली झाली असूनआज तगायत. संपूर्ण राज्यात कै किसन मोहन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ब्लॅकबेल्ट घडविण्याचे कार्य केले असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी महिलांवर होणारे अत्याचार या गोष्टी लक्षात घेऊन इंडियन मार्शल आर्ट या संस्थेने महिलांनी महिलांचे संरक्षण करावे याकरता संस्थेने पुढाकार घेऊन सदर स्पर्धेचे आयोजन केले आहे प्रशिक्षणार्थी महिलांना सलग तीन वर्ष मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे संस्थेचे ट्रस्टी सुदर्शन साळुंखे व संस्थेचे सर्व संचालक यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले ज्या ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये असे प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास त्या ठिकाणी इंडियन मार्शल आर्ट चे पदाधिकारी जाऊन प्रशिक्षण चालू करणार असून त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थिनीना मोफत तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे इंडियन मार्शल आर्ट संस्थेचे नावलौकिक करण्यामध्ये मनोहर भोसले सागर सोळंकी अमित साळुंखे मनोज दिवार गणेश चव्हाण जॉनी परमार सुधाकर भुजबळ रवी शिंदे विनय खत्री किशोर साळुंखे प्रमोद खत्री यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच या स्पर्धेच्या महिला अध्यक्ष म्हणून पद्मभूषण कल्पना सरोज यांची निवड करण्यात आली असून हुलगेश चलवादी हे अध्यक्ष असणार आहेत तसेच युवक अध्यक्षपदी पितांबर साळुंखे हे काम पाहतील स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकाला एक नंबर एक लाख रुपये दोन नंबर 75 हजार रुपये तीन नंबर 50 हजार रुपये असे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती इंडियन मार्शल आर्ट चे नवनिर्वाचित अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले या पत्रकार परिषदे वेळी रमाकांत शर्मा पूनम साळुंखे देविदास अरु महादेव शिंदे भारती मॅडम इत्यादी पदाधिकारीउपस्थित होते
प्रतिक्रिया (0)
No comments yet. Be the first to comment!