CSK vs MI Live Score IPL 2025 : चेन्नईत खलील अहमदचा तांडव! मुंबईला धक्क्यावर धक्के, 36 धावांवर पडली तिसरी विकेट, अश्विनने केली मोठी शिकार

CSK vs MI Live Score IPL 2025 : चेन्नईत खलील अहमदचा तांडव! मुंबईला धक्क्यावर धक्के, 36 धावांवर पडली तिसरी विकेट, अश्विनने केली मोठी शिकार
CSK vs MI IPL 2025: आयपीएल मधील एल क्लासिको सामना म्हणजेच मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज २३ मार्चला खेळवला गेला. ज्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे.
IPL 2025 CSK vs MI Highlights: आयपीएलच्या १८ व्या सीझनमधील हायव्होल्टेज सामना म्हणजेच दोन चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला गेला. नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलमधील पहिला सामना देवाला देत पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईने रचिन रवींद्र व ऋतुराज गायकवाड यांची अर्धशतकी आणि सामनावीर ठरलेल्या नूर अहमदच्या ४ विकेट्सच्या जोरावर मुंबईवर ४ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने चेन्नईला विजयासाठी १५६ धावांचे आव्हान दिले होते, जे चेन्नईने ५ चेंडू शिल्लक ठेवून जिंकले. पण मुंबईनेही कडवी झुंज दिली. मुंबईचा नवा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूर या सामन्यात ३ विकेट्स घेत चर्चेत आला. CSK vs MI IPL 2025: आयपीएल मधील एल क्लासिको सामना म्हणजेच मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज २३ मार्चला खेळवला गेला. ज्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे.
पुढील बातमी

प्रतिक्रिया (0)

अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. प्रथम प्रतिक्रिया द्या!