असा हा स्वार्थातून परमार्थांकडे जाणारा प्रकल्प आहे! यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री श्री निलेश लिमये यांच्या सहकार्यातून सेंचुरी एन्का प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिली आहे.
रस्त्यावरील कचरा आपोआप उचलला जाईल... नद्या प्रदूषित होणार नाहीत... याशिवाय फुलांच्या कचऱ्यापासून निर्माण झालेली लक्ष्मीः रस्त्यावरील अनेक भीक मागणाऱ्या लोकांच्या चुली पेटवेल....
असा हा स्वार्थातून परमार्थांकडे जाणारा प्रकल्प आहे!
यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री श्री निलेश लिमये यांच्या सहकार्यातून सेंचुरी एन्का प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिली आहे.
याव्यतिरिक्त या प्रकल्पासाठी लागणारा इतर सर्व खर्च बिग बक्स फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, श्री विपुल भाई शहा यांनी उचलला आहे.
या रोजगार केंद्रामध्ये कापडी पिशव्या शिवणे, शोभेच्या वस्तू तयार करणे, तसेच लिक्विड वॉश तयार करणे असे इतरही आणखी उपक्रम आहेत.
या सर्व बाबींमधून मिळालेला सर्व निधी हा रोजगार केंद्रात काम करणाऱ्या लोकांना पगार म्हणून दिला जाणार आहे.
यासाठी मेहता सोप कंपनी आणि डॉ. सौ भारती पांडुरंग सोनवणे यांनी या प्रकल्पास आपले तंत्रज्ञान आणि कौशल्य मोफत देऊ केले आहे.
भीक मागणाऱ्या लोकांसाठी एक स्वतंत्र "प्रशिक्षण व रोजगार केंद्र" हवे हे गेल्या दहा वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे. या दरिद्री नारायणांसाठी इतके हात पुढे सरसावतील याची कल्पना नव्हती, मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन, अशा शब्दात डॉ. अभिजीत सोनवणे यांनी दात्यांचे आभार मानले.
समाजाने रस्त्यावर भीक देणे बंद करून या भीक मागणाऱ्या समाजाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे. योग्य दिशा दिल्यास भीक मागणाऱ्या समाजाला निष्क्रीय सहावे बोट न समजता त्यांच्या शक्तीचा योग्य तो उपयोग स्वतःच्या कुटुंबासाठी तसेच देशाच्या उन्नतीसाठी करता येऊ शकतो, असे मत डॉ मनीषा सोनवणे यांनी व्यक्त केले.
हा सर्व उपक्रम समाजाने दिलेल्या वर्गणीवर सुरू राहणार आहे.
या उपक्रमास समाजाने शारीरिक, आर्थिक आणि मानसिक मदत केली तर जास्तीत जास्त भीक मागणाऱ्या लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेऊन "भिकारी" हि संकल्पनाच संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास या दांपत्याने व्यक्त केला.
पुणे कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.
30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरू होणाऱ्या या प्रकल्पास श्री. शिरीष सरदेशपांडे, डीसीपी अँटीकरप्शन ब्यूरो, श्रीमती ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त भिक्षेकरी प्रतिबंध शाखा, महिला व बालकल्याण विभाग, श्रीमती सुवर्णाताई पवार, सह आयुक्त महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था इत्यादी मान्यवरांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
प्रतिक्रिया (0)
अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. प्रथम प्रतिक्रिया द्या!